Chinchwad: क्वीन्स टाऊन सोसायटीत रंगला दिवाळी पहाट

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील क्वीन्स टाऊन सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात कलाकारांनी सादर केलेल्या सदाबहार गाण्यांमुळे रंगत आणली. प्रभा एंटरप्रायजेस  प्रस्तुत “स्वर चैतन्य” दिवाळी पहाट कार्यक्रमास रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

सोसायटीचे अध्यक्ष सुजित पाटील, सचिव शिरीष पोरेड्डी, सुरेश गारगोटे यांच्यासह सुमारे पाचशे सदस्य उपस्थित होते. यावेळी सूर निरागस हो, सूरत पिया, उगवला चंद्र पुनवेचा, पाहिले ना मी तुला, का रे दुरावा, मलमली तारुण्य हे, एकच या जन्मी, वारा गाई गाणे, किशोर कुमार यांचे हिंदी गाणे, सूफी व यमन राग, मेलडी, भक्तिगीते सादर केली. तसेच ये चांद सा रोशन चेहरा, मेरे ढोलाना…, अभी ना जाओ छोडके.., पिया बावरी.., रेशमाच्या रेघांनी या गाण्याने कार्यक्रमास अधिक रंगत आणली.

_MPC_DIR_MPU_II

या दिवाळी पहाटमध्ये चैतन्य कुलकर्णी, प्रणाली काळे, अपूर्वा नानिवडेकर यांनी गायन केले तर वाद्यवृंद म्हणून अमित कुंटे, ऋतुराज कोरे, शैलेश लेले, सौरभ नवांगुल, कौस्तुभ देशपांडे, अनय गाडगीळ यांनी साथ केली. अभिजीत कुलकर्णी यांनी निवेदन केले.

यावेळी हाफ आयर्नमॅन ठरलेले मंगेश कोल्हे, राघवन सी.के, अनुजा देशपांडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सोसायटीसाठी वर्षभर सेवा देणारे सुरक्षारक्षक, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, बागकाम व सफाई कर्मचारी अशा 200 कर्मचाऱ्यांना पूर्ण पोशाख देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सुरेश गारगोटे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.