Chinchwad: अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी सहकुटुंब बजाविला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी आज (सोमवारी) सकाळी सहकुटुंब वाकड येथील शाळेत आपला मतदानाचा हक्क बजाविला. त्यांच्यासोबत आई कमल कलाटे, पत्नी वृषाली कलाटे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजाविला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. 491 ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. चिंचवड मतदारसंघात नागरिकांचा मतदानाला प्रतिसाद मिळत आहे. चिंचवडमधून कलाटे यांच्यासह 11 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, वंचित आघाडीने पाठिंबा दिलेले सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी आई कमल कलाटे, पत्नी वृषाली कलाटे यांच्यासह वाकड येथील कमल प्रतिष्ठानच्या माऊली लिटराजन स्कुलमध्ये आपला मतदानाचा हक्क बजाविला.

मी मतदान केले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्वांनी मतदान करून आपला हक्क बजवावा. मतदान करावे. लोकशाहीचा मोठा उत्सव आहे. सर्वांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन कलाटे यांनी मतदारांना केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.