Chinchwad : महा विकास आघाडी शासनाकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा – राजू शेट्टी

एमपीसी न्यूज – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज (गुरुवारी) सत्तेची सूत्रे हाती घेत असलेल्या महा विकास आघाडी शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले.

महा विकास आघाडीच्या नव्या मंत्रिमंडळ शपथविधीसाठी मुंबईला जाताना काही कामानिमित्त शेट्टी चिंचवड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी एमपीसी न्यूजच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार, कार्यकारी संपादक हृषीकेश तपशाळकर यांनी त्यांचे स्वागत केले.

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नवीन सरकार काय पावले उचलते, ते लवकरच कळेल, असे शेट्टी म्हणाले.

शेट्टी यांच्या भेटीच्या वेळी नगरसेवक अमित गावडे तसेच सामाजिक कार्यकर्ते मिलिंद फडे, अजित पाटील, जितेन शहा, भूपाल बसन्नावर, सुदीन खोत, विजय भिलवडे, जालिंदर शिंदे, प्रकाश शेडबाळे, एमपीसी न्यूज बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अनुप घुंगुर्डे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.