Chinchwad: प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे काम वेगात पूर्ण करा; सभागृह नेत्याच्या अधिका-यांना सूचना

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे नूतनीकरण झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील रसिक, कलावंतासाठी हे प्रेक्षागृह पर्वणी ठरेल. त्यासाठी पेक्षागृहाचे दुरुस्तीची कामे झटपट पूर्ण करावीत, अशा सूचना महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी महापालिका अधिका-यांना केल्या आहेत.

यावेळी महापालिकेचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. एकनाथ पवार म्हणाले की, सांस्कृतिक शहर म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आहे. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात कार्यक्रमास येत असतात. मोठमोठे उत्सव, सेमिनार, सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी केले जातात. शहरातील नाट्यसंस्था, कलावंत व प्रेक्षकांसाठी सुसज्ज असे प्रेक्षागृह असणार आहे. या मध्ये प्रामुख्याने तुटलेल्या खुर्च्या, स्वच्छतागृहांची अंतर्गत दुरूस्ती, प्रवेशद्वारावरील भव्य कमान, पार्किंगची सुसज्ज व्यवस्था, तिकीट बुकिंग विंडो, सभागृह, बाल्कनी, स्टेज, बॅकस्टेज, ग्रीन रुम, व्हीआयपी रुम, साउंड सिस्टीम यामध्ये अत्याधुनिकता करण्यात येणार आहे. ही सर्व कामे या नूतनीकरणाच्या माध्यमातून होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षागृहाची रचना आणखी आकर्षक होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.