Chinchwad : प्लॅस्टिक वापरणा-यांकडून सुमारे 10 हजार 150 रुपयांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्लॅस्टिक वापरणा-यांवर धडक कारवाई केली आहे. डांगे चौक येथील पुरोहित स्विटस व न्यू भैरव सिलेक्शन यांच्याकडे प्लॅस्टिक सापडल्याने त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड असा मिळून दहा हजार एकशे पन्नास रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई आज करण्यात आली.

पर्यावरणाचा -हास करणा-या प्लॅस्टिकला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने प्लॅस्टिकच्या पिशव्या, चमचे, ग्लास, स्ट्रा, थर्माकोल, ताट, ग्लास, वाट्या, उत्पादने साठविण्यासाठी असलेली प्लॅस्टिकची आवरणे, द्रवपदार्थ साठविण्यासाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक, अन्न पदार्थ साठविण्यासाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक, प्लॅस्टिक आणि थर्माकोल डेकोरेशन यावर बंदी घातली आहे.

  • २३ मार्च रोजी राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदीची अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर या वस्तूंचा साठा पूर्णपणे संपण्यासाठी २२ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेकडून प्लॅस्टिक वापरणा-यांवर धडक कारवाई केली जात आहे.

प्रभाग क्रमांक २४ मध्ये दि. १४ मे रोजी डांगे चौक 16 नंबर बसस्टॉप येथे 10 दुकानांची तपासणी केली असता त्यापैकी 2 दुकानदारानकडून (पुरोहित स्वीट्स 9.446 किलो) आणि ( न्यु भैरव सिलेक्शन 1 किलो ) प्लॅस्टिक सापडल्यांने त्यांच्याकडुन प्रत्येकी 5000/- रु दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच थुंकल्यामुळे 1 व्यक्तीकडून 150 रु दंड वसूल करण्यात आला असे एकूण मिळून 10150/- रु दंड वसूल करण्यात आला आहे. ही सर्व कारवाई आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरीक्षक राजीव बेद आणि आरोग्य निरीक्षक एस.बी.चन्नाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली .

  • नागरिक, दुकानदार, व्यापारी यांना वारंवार सूचना देऊन तसेच दंडात्मक कारवाई करुनही अद्याप प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा वापर सुरु असल्याचे दिसून येते. ही बाब योग्य नसून नागरिकांनी प्लॅस्टिक, थर्माकोलचा वापर टाळावे, असे आवाहन केले आहे.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like