Chinchwad : चारचाकी दिली नाही म्हणून तोंडी तलाक बोलून केले दुसरे लग्न; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हुंड्यात चारचाकी दिली नाही, म्हणून (Chinchwad) नवऱ्या मुलाने दुसरे लग्न करत पहिल्या पत्नीला तोंडी तलाक दिला आहे. यावरून पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 फेब्रुवारी 2021 ते 4 फेब्रुवारी 2023 या कालावधीत घडला.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्यात पती ईलाही ईस्माईल शेख (वय 39), सासरे ईस्माईल शेख (वय 65) दिर जावेद शेख (वय 33) व तीन महिला आरोपी सर्व राहणार टिपू सुलतान (रा. झोपडपट्टी चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या माहेरून चारचाकी गाडीची व दागिन्यांची मागणी केली. लग्नात काही आणले नाही, म्हणून शारिरीक व मानसिक त्रास दिला.

Repo Rate : रेपो दरात सलग सहाव्यांदा वाढ; गृहकर्ज आणि कार लोन महागणार!

फिर्यादीच्या नकळत पतीने दुसरे लग्न केले. याचा जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपीने तोंडी तीन वेळा तलाक (Chinchwad) दिला व घरातून हाकलून काढले. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.