Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दोन्ही महिला उपायुक्तांची बदली

स्मिता पाटील यांची पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात बदली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील आणि पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांची बदली करण्यात आली आहे. तर खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या स्मिता पाटील आणि सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (नियोजन व समन्वय) सुधीर हिरेमठ यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात उपायुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलीस सेवेतील 52 पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या. त्याबाबतचे आदेश आज (सोमवारी) काढण्यात आले. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडच्या दोन्ही महिला पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे. तर खंडाळा येथून स्मिता पाटील यांची आणि राज्य पोलीस मुख्यालयातून सुधीर हिरेमठ यांची पिंपरी-चिंचवड शहरात बदली करण्यात आली आहे.

  • पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांची सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (आस्थापना), पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई येथून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात 27 जुलै 2018 रोजी बदली करण्यात आली. त्यानंतर वर्षपूर्ती होण्याअगोदरच त्यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड मधून त्यांची राज्य गुप्तवार्ता विभाग, सागरी परिक्षेत्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे उप आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे.

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एकच्या पोलीस उप आयुक्त पदावरून 27 जुलै 2018 रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली होती. त्यांची देखील वर्षपूर्ती होण्यापूर्वीच बदली करण्यात आली आहे. ठाणे शहर, विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त पदावर त्यांची बदली करण्यात आली आहे.

  • खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या स्मिता पाटील यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात परिमंडळ एकच्या उपायुक्त पदावर बदली करण्यात आली आहे.

सुधीर हिरेमठ यापूर्वी राज्य पोलीस मुख्यालय मुंबई येथे सहाय्यक पोलीस महानिरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांची आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात परिमंडळ दोनच्या उपायुक्त पदावर बदली करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.