Chinchwad : युवा पिढीला समाजभान ओळखता आले पाहिजे- निवृत्त कमांडर योगेश चौधरी

एमपीसी न्यूज- युवापिढीला समाजभान ओळखता आले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही असे मत निवृत्त कमांडर योगेश चौधरी यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. माजी कमांडर योगेश चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते भरतभाई शहा, संस्थेचे विश्वस्थ डॉ. सुशील मुथीयान, संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, अध्यक्षा प्रतिभा शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, प्राचार्या डॉ. पोर्णिमा कदम, शाळेच्या मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस, एम.बी.ए विभागाचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्‍हाडे, डॉ. जयश्री मुळे, प्राध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

योगेश चौधरी पुढे म्हणाले, ” समाजात मंदबुद्धीचे लोक स्वैराचार वाढवितात. युवकांनी अशा लोकांपासून दूर रहावे, सैन्य दलात युवापिढीला अनेक संधी उपलब्ध असून, येथे मात्र स्वयंशिस्तीला फार महत्त्व असते. युवकांनी शिक्षक व पालकांकडून शिस्त अंगीकारावी, अभ्यासाबरोबर इतर साहित्यांचे नियमित वाचन करा, त्यामुळे स्वतःविषयी आत्मविश्वास वाढतो. भविष्यात जे करायचे आहे. त्याची ध्येयनिश्चिती ठरवून आपली स्वप्नपूर्ती करावी”

डॉ. दीपक शहा म्हणाले, “येणार्‍या 2030 साली आपला भारत देश जगात युवकांचा देश होणार आहे, युवकांनी देखील संविधानाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करू नये, देशाच्या व समाजाच्याप्रती संवेदना, भाईचारा, प्रेम सदैव जागृत ठेवून स्वतःबरोबर देशालाही समृद्ध करण्यासाठी आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे” .

यावेळी प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच, कला, क्रीडा, काव्य आदी क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना उपस्थितांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. महिमा सिंग, प्रा. पल्लवी चुग यांनी तर, आभार प्रा. निजी साजन यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.