Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक जुने साहित्य देण्याचे आवाहन 

एमपीसी  न्यूज – संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरीब व गरजू, अपंग, मुकबधीर, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. 

दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील जुनी पुस्तके व वह्या, पेन, पेन्सिल, दप्तरे, कंपासपेटी, रंगपेटी, जुनी सायकल शक्यतो एक डझन नवीन वह्या देणगी म्हणून द्याव्यात. संकलित केलेले सर्व साहित्य समाजातील गोरगरीब व गरजू, अपंग, मुकबधीर, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना वाटप केले जाणार आहे.
  • आपल्या मुलांची सुस्थितील देण्यायोग्य असलेली वह्या पुस्तके खालील पत्यावर आणुन द्यावीत. या संदर्भात डॉ मोहन गायकवाड अध्यक्ष संपर्क – ९९२२४२६०३१, रंजना जोशी उपाध्यक्षा संपर्क – ८६०५४२३२७०, सोमनाथ पतंगे उपाध्यक्ष  ९९२२९३३८५९, डॉ मृणाल फोंडेकर संचालिका संपर्क -९८२०८२९७९६, रुपाली नामदे मोहननगर संपर्क – ९५५२६३०६२९, प्राजक्ता रुद्रवार रावेत संपर्क – ९७६५४९६८५८, भरत शिंदे थेरगाव संपर्क – ९८८१९८६१९१ मोहन पुंडे भोसरी संपर्क – ९२२४२३८६९, भाऊसाहेब मातणे संभाजीनगर संपर्क – ८८८८८११९३६, मंजुषा रत्नपारखी चिंचवडगाव संपर्क – ८१०२९२०५. यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.