Chinchwad : संगीत महोत्सवात वादन, गायन मैफलीचा पिंपरी- चिंचवडकरांनी घेतला आस्वाद

रवींद्र घांगुर्डे, शरयु दाते, सावनी रवींद्र यांच्या गायनाला रसिकांची दाद

एमपीसी न्यूज – डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने संगीत महोत्सव कलाविष्कार सादर करण्यात आला. गायन वादनाची मैफल रंगली. त्यास रसिकांनी दाद दिली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे हि मैफल पार पडली. डॉ. रवींद्र घांगुर्डे, डॉ. वंदना घांगुर्डे, डॉ.वसंतराव देशपांडे युवा कलाकार पुरस्कार विजेती शरयु दाते व प्रसिध्द गायिका सावनी रवींद्र यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यमन रागातील मोमन लगन लागी…… या विलंबित तीन तालातील ख्यालाने सुरुवात करुन ‘जिया मे बसलीनो शाम’ ही आद्यचौताल तालातील जोड बंदिश त्यांनी सादर केली. त्यांनतर ‘जाओ सैया जाने अबना छेडो….’.ही राग बागेश्रीमधील बंदीशी पाठोपाठ मी राधिका प्रेमिका हे प्रसिध्द गीत व शेवटी ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’ सादर केले. साथसंगत तबला विवेक भालेराव, संवादिनी उपेंद्र सहस्त्रबुध्दे, टाळ जयेश शेलुडकर यांची होती. डॉ. वसंतराव देशपांडे यांचे सांगितिक जीवनचरित्राचा माहितीपूर्ण लघुचित्रपट दाखविण्यात आला.

  • पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते गायिका शरयु दाते यांना तात्यासाहेब नातू फाऊंडेशनद्वारा पुरस्कृत डॉ. वसंतराव देशपांडे युवा कलाकार पुरस्कार प्रदान केला. पुरस्काराचे स्वरुप अकरा हजार, मानचिन्ह व पुष्पगुच्छ असे होते. यावेळी उद्योजक सचिन नवले, सारंग नातू, डॉ. रवींद्र घांगुर्डे, विश्वस नाना दामले, प्रभाकर लेले आदी उपस्थित होते.

फाऊंडेशनद्वारा कार्यकर्त्यांमधून एक नि:स्पृह कार्यकर्ता तसेच रसिकांमधून नियमित उपस्थित देणा-या रसिकांस रसिकराज पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी दर्शन कुलकर्णी यास नि:स्पृह कार्यकर्ता व नितीन रानडे यांना रसिकराज पुरस्कार देण्यात आला.

  • कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. आसावरी पाटणकर व सहकारी यांचे कथकनृत्य सादर केले. गणेश वंदना तालविस्तार मिनती सादर झाल्यानंतर मारया रागातील तीनतालमधील ठुमरी सादर केली. कथक व ठुमरी जस नात तस चैती फजरी हो रहीचही नात असत अस सांगत गिरिजादेवी यांनी गायलेल्या व पंडिता रोहिणी भाटे रचित ‘बरसन लागी बदरीया झुम झुम के’ ही नृत्यरचना सादर झाली.

गायिका गौरी पाठारे यांचे गायन झाले. गायन रागातील ‘आस लागी तुमरो दरसन की… ‘या विलंबित ख्यालाने सुरुवात झाली. डॉ. वसंतरावाचे या भवनातील गीत पुराणे हे नाट्यपद सादर करुन भैरवी गात मैफल समाप्त झाली. पारंपारिक नृत्य रचनेत नवीन प्रयोग म्हणून जुस्तजू ही नृत्यरचना सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा कुलकर्णी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.