Chinchwad Result : चिंचवड पोटनिवडणुकीत कोणाला मिळाली किती मते? जाणून घ्या उमेदवारांच्या मतांची टक्केवारी…

एमपीसी न्यूज – केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत (Chinchwad Result) संकेतस्थळावर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे.

चिंचवड मतदारसंघात भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना 1,35,603 तर महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल तथा नाना काटे यांना 99,435 मते मिळाली आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 44,112 मतांवर समाधान मानावे लागले आहे.

या मतदारसंघात एकूण 28 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 25 उमेदवारांना दोन आकडी किंवा फार-फार तर तीन आकडी मतांवर समाधान मानावे लागले आहे. 2730 मतदारांनी सर्वच्या सर्व उमेदवारांबाबत नापसंती नोंदविली आहे.

अ. क्र.उमेदवाराचे नावपक्षाचे नावमिळालेली मतेटक्केवारी
1अश्विनी लक्ष्मण जगतापभाजप135,60347.23
2विठ्ठल तथा नाना काटेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी99,43534.63
3राहुल कलाटेअपक्ष44,11215.36
4प्रफुल्ल मोटलिंगमहाराष्ट्र लोकहितवादी पार्टी3790.13
5मनोज खंडागळेआझाद समाज पार्टी1740.06
तुषार लोंढेबहुजन भारत पार्टी1220.04
7अड. सतीश कांबियेबहुजन मुक्ती पार्टी1150.04
8अजय लोंढेअपक्ष1060.04
9अनिल सोनवणेअपक्ष450.02
10अमोल सूर्यवंशीअपक्ष2590.09
11किशोर काशीकरअपक्ष3160.11
12गोपाळ तंतरपाळेअपक्ष4390.15
13चंद्रकांत मोटेअपक्ष480.02
14जावेद रशिद शेखअपक्ष1130.04
15दादाराव कांबळेअपक्ष3050.11
16बालाजी जगतापअपक्ष3400.12
17सुभाष बोधेअपक्ष6600.23
18डॉ. मिलिंदराजे भोसलेअपक्ष2760.1
19मिलिंद कांबळेअपक्ष970.03
20मोहन म्हस्केअपक्ष820.03
21रफिक कुरेशीअपक्ष1840.06
22राजू उर्फ रविराज काळेअपक्ष1210.04
23सोयलशहा शेखअपक्ष740.03
24श्रीधर साळवेअपक्ष3160.11
25सतीश सोनवणेअपक्ष490.02
26सिद्दीक शेखअपक्ष3980.14
27सुधीर लक्ष्मण जगतापअपक्ष1120.04
28हरीश मोरेअपक्ष1170.04
29नोटा27310.95
एकूण287,128100


मतविभागणीचा फटका विरोधकांना – 

झालेल्या एकूण 2,87,128 मतदानापैकी 47.23 टक्के मते मिळवून भाजपच्या अश्विनी जगताप यांनी विजयश्री खेचून आणली. महाविकास आघाडीच्या नाना काटे यांना 34.63 टक्के तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 15.36 टक्के मिळाल्याचे दिसून येत आहे.

याचाच अर्थ असा की, जगताप यांच्या विरोधात 52.77 टक्के मते नोंदविली गेली, मात्र ती  (Chinchwad Result) विभागली गेल्यामुळे जगताप निवडून आल्या. काटे आणि कलाटे यांच्या मिळालेल्या मतांची टक्केवारी एकत्र केली तर ती 49.99 म्हणजेच जवळजवळ 50 टक्के होते. महाविकास आघाडीला बंडखोरी टाळण्यात यश आले असते, तर कदाचित वेगळा निकाल लागू शकला असता, असे आकडेवारीच्या विश्लेषणावरून दिसून येत आहे.

Kasaba Result : अभिजित बिचुकले आणि आनंद दवे यांना किती मते मिळाली?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.