Chinchwad : सेवानिवृत्त सैनिकांचा महात्मा फुलेनगरवासियांकडून सत्कार

एमपीसी न्यूज – भारतीय सैन्य दलात राहून प्रणाची बाजी लावून ( Chinchwad) देशाचे संरक्षण करणाऱ्या  अशीच  देशसेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झालेल्या सैनिक ‘सुभेदार अविनाश किसन वाघ’आपल्या कुटुंबात सुखरूप परत आल्याबद्दल महात्मा फुलेनगर, चिंचवड येथील नागरिक व प्रकाश कांबळे कुटुंबियाकडून ह्रद्य सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम शनिवार (दि.18)  श्री नागेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आला होता.

जे सुपुत्र देशाचे रक्षण करतात याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श सर्व नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा, या विधायक हेतूने निवृत्त सैनिकांचा यथोचित सन्मान करण्याचे काम महात्मा फुलेनगर नागरिकांच्या वतीने सातत्याने करण्यात येते, असाच एक सन्मान सोहळासुभेदार अविनाश किसन वाघ, जवान नुकतेच निवृत्त झाले. यांचा थाटात सन्मान करण्यात आला. निवृत्त सैनिकांच्या सन्मान प्रसंगी सैनिक श्री नागेश्वर मंदिर येथे वसाहती मधील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान व स्वामी समर्थ सांस्कृतिक मंचाच्या सर्व सदस्य व महिला निवृत्त जवान कुटुंबीयासह उपस्थित होते.

Pimpri : सीताराम कांडी पीसीसीओईआर मध्ये इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन कार्यशाळा संपन्न

नागरिकांचा उत्साह पाहून तेही भावूक झाले होते. “भारत माता की जय’ असा जयघोष करीत देशभक्तीच्या वातावरणात सर्वप्रथम महिलांनी या सैनिकांचे औक्षण केले. संस्थेकडून केलेल्या सन्मानाने देशसेवा करताना निवृत्त झालेल्या सैनिकांची छाती सन्मानाने फुलून आली होती.भारतीय सैनिकांचा सार्थ अभिमान आहे, लोकांनी हा आदर्श समोर ठेवून देश रक्षणासाठी भारतीय सैन्यात दाखल व्हावे, असे भावना व्यक्त करताना त्यांना आनंद आश्रूही आले.

असा झाला सन्मान महात्मा फुलेनगर येथील श्री नागेश्वर मंदिराच्या भव्य प्रांगणात आयोजित कार्यक्रमात सचिन सानप, यशवंत कण्हेरे, रवी वाघ, बर्मु पाखरे,प्रदीप सपकाळ,सयाजी कदम, दिलीप पवार, बाबा देसाई,अतुल काळोखे, स्वप्नील कांबळे व मित्रपरिवार यांची उपस्थिती होती. मेजर अविनाश वाघ यांच्या पत्नीसह शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान झाला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना सैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या सत्कार सोहळ्यास श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान व स्वामी समर्थ सांस्कृतिक मंच संस्थेचे कार्यकारिणी मंडळ आणि संस्थेतील महिला, पुष, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यशवंत कण्हेरे, सचिन सानप, रवी वाघ, दिलीप पवार व यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे सचिव शिवानंद चौगुले यांनी (Chinchwad) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.