Chinchwad : पियुष निमसे याची राज्यस्तरीय रायफल शुटिंग स्पर्धेसाठी निवड

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि संदीप तरटे शुटिंग अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागीय रायफल शुटिंग स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये चिंचवडच्या शिवाजीराजे विद्यालयाचा खेळाडू पियुष निमसे यांची राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेकरिता निवड झाली.

श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयचा पियुष निमसे याने (वय 17 ओपन साईट 325×400) प्रकारात कांस्यपदक मिळविले . त्याची राज्य स्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली. ही स्पर्धा शिरुर येथील सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फॉर्मसी येथे घेण्यात आली होती. या त्याच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णा जाधव यांनी रोख पारितोषिक देऊन गौरव केला. विद्यालयाचे उपाध्यक्ष जगदीश जाधव, संचालक विजय जाधव, मुख्याध्यापिका प्रतिभा देशपांडे, प्राचार्य बाळाराम पाटील, पर्यवेक्षक अनिल करपे, उपमुख्याध्यापक किसन अहिरे यांनी कौतुक केले. विद्यालयाचे क्रीडाशिक्षक दत्तात्रय भालेराव आणि शब्बीर मोमीन यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.