Chinchwad : मोहननगर येथे सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज- पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व शिवसेनेच्या नगरसेविका मीनल विशाल यादव यांच्या पुढाकाराने आज, बुधवारी मोहननगर येथे सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, अ प्रभाग अध्यक्ष नगरसेविका शर्मिला बाबर, वैशाली काळभोर, नगरसेवक जावेद शेख, सुनील कदम, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, राजू मिसाळ, प्रकाश बाबर, प्रमोद कुटे, सामाजिक कार्यकर्ते विजय गुप्ता, संजय जगताप, प्रतिभा लोखंडे, गणेश लंगोटे, किरण देशमुख, राहुल दातीर पाटील, शिवसेना विभाग प्रमुख विशाल यादव आदी उपस्थित होते .

या कामाअंतर्गत मोहननगर छत्रपती शिवाजी महाराज कमान ते मेहता हॉस्पिटल या पूर्ण रस्त्यामध्ये ड्रेनेजच्या लाईन, स्ट्रॉम वॉटर लाईन, पाण्याची लाईन, लाइटच्या पोलच्या वायरिंग तसेच येथून पुढे होणाऱ्या वायर्ससाठी वेगळी लाईन व चेंबर करण्यात येणार असून त्यानंतर संपूर्ण काँक्रिटीकरण, सिमेंटचा रस्ता होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like