BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : घरफोडी करणाऱ्या तडीपार सराईतास ठोकल्या बेड्या; चार गुन्हे उघडकीस

अडीच लाखांचा ऐवज हस्तगत; चिंचवड पोलिसांची कामगिरी

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला चिंचवड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आले असून अडीच लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

चंद्रकांत अनंत माने (वय २५ रा. वेताळनगर, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे.

  • सराईत माने हा चिंचवड परिसरात असल्याची माहिती पोलीस नाईक स्वप्नील शेलार यांना मिळाली. त्यानुसार चिंचवड पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. अधिक चौकशी केली असता त्याने इतर साथीदारांच्या मदतीने बालाजीनगर येथील नारायण सुपर मार्केट, सावन बिअर शॉपी, विशाल ड्रेसेस या चारही ठिकाणी घरफोडी करत बीअरच्या बटल, कपडे, सोन्याचे दागीने, मिठाई, सॅमसंग कंपनीचा फोन इत्यादी चोरी केल्याचे कबुल केले.

पोलिसांनी सुमारे १ लाख २९ हजार रुपयांचे सोने व १ लाख २० हजार रुपयांच्या दोन दुचाकी असा एकूण २ लाख ५८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्‍वजीत खुळे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस हवालदार पांडुरंग जगताप, पोलीस नाईक राजेंद्र शिरसाठ, स्वप्नील शेलार, विजय आखाडे, गोविंद डोके यांनी कामगिरी केली.

HB_POST_END_FTR-A4

.