Chinchwad : माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांना धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप यांना त्यांच्या व्यावसायिक कार्यालयात आर्थिक कारणावरून धमकी दिल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलिंद गवई (रा. शांतीबेन सोसायटी, वाल्हेकरवाडी) असे या प्रकरणातील आरोपीचे आहे. याप्रकरणी प्रदीप नाईक (रा. प्राधिकरण, निगडी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप नाईक यांचा चिंचवड येथे कागदी कप व डिश बनविण्याचा उद्योग आहे. त्यांच्या कारखान्यात आरोपी मिलिंद यांची पत्नी कामास होती. त्यांनी चार दिवस काम केले. त्यानंतर काम सोडले. त्या चार दिवसांचा पगार मागण्यासाठी मिलिंद आणि त्यांच्या पत्नी आल्या नाईक यांच्या कारखान्यात आल्या. नाईक यांनी त्यांना जो हिशोब असेल त्याप्रमाणे पैसे देऊ असे त्यांना सांगितले. त्यावर ‘आम्हाला आत्ताच्या आत्ता पैसे हवेत’ असे म्हणत नाईक यांना बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.