Chinchwad: आदेशाची पायमल्ली, पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून आणखी 129 जणांवर कारवाई

Chinchwad: rule break, Pimpri-Chinchwad police took action against 129 others पोलिसांची कारवाई शहरवासीयांच्या अंगवळणीच पडली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

एमपीसी न्यूज– पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी आणखी 129 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून हे कारवाईचे सत्र अविरत सुरु आहे.

दररोज नागरिक प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करतात आणि दररोज पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात. पोलिसांची कारवाई शहरवासीयांच्या अंगवळणीच पडली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातील 125 जणांना गुरुवारी (दि.11) कोरोनाची लागण झाली आहे. ही आजपर्यंतची सर्वांत मोठी वाढ आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांचा आकडा एक हजार 57 एवढा झाला आहे.

शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने एका हजाराचा टप्पा ओलांडला आहे. त्यात लॉकडाऊनमध्ये मिळालेली शिथिलता यामुळे नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी येत आहेत. यामुळे धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

गुरुवारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार भोसरी एमआयडीसी (0), भोसरी (1), पिंपरी (12), चिंचवड (28), निगडी (0), आळंदी (6), चाकण (0), दिघी (5), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (17), वाकड (26), हिंजवडी (18), देहूरोड (3), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (12), रावेत चौकी (1), शिरगाव चौकी (0) अशा एकूण 129 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.