Chinchwad : पॅरिस डान्स ऑलिपॅडमध्ये चिंचवडच्या समृद्धी यादवला रौप्य पदक

एमपीसी न्यूज : अखिल भारतीय  सांस्कृतिक संघ,  युनेस्कोच्या(Chinchwad) कल्चरल विभाग व भारत सरकार यांच्या विद्यमाने पॅरिस येथे आयोजित 13 व्या कल्चरल डान्स ऑलिपॅड स्पर्धेतील  इथेनिक सोलो या नृत्य प्रकारात शाहूनगर, चिंचवड येथील समृद्धी दत्तात्रय यादव हिने द्वितीय क्रमांकासह रौप्य पदाकाची कमाई केली. तिच्या या यशाबद्दल भोसरीचे  आमदार महेश  लांडगे यांच्यासह सारिका पवार, कविता हिंगे, अजय पताडे, पंकज निकम व पिंपरी चिंचवडकरांनी तिचे अभिनंदन केले.

 एबी.एस.एस.च्या प्रमुख रत्ना वाघ, हेमंत वाघ तसेच युनेस्कोच्या कल्चरल कमिटीचे प्रमख  जुडेत व्हॅन झडेन यांच्या हस्ते समृद्धीला  रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले.   समृद्धी सध्या पुण्यातील डॉ. ‌भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे  वास्तुशास्त्र विभागात चौथ्या वर्षात शिकत आहे. 

समृद्धी हिने सन 2010 पासून  आतापर्यंत आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धांमध्येय  सहा वेळा सहभाग घेऊन सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके मिळविली आहेत. तिने थायलंड, मलेशिया, दुबई, सिंगापूर, मॉरीसिस अशा विविध देशांमध्ये  आपली नृत्य कला सादर केली आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन, अखिल भारतीय नाट्य (Chinchwad)संमेलन, पुणे फेस्टिवल,  दम दमा दम आणि  इंद्रा या सिनेमांमध्येही  तिला नृत्य सादर करण्याची संधी मिळाली आहे. 

सन २०१७ मध्ये तिला राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट नृत्यकलाकार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांच्या हस्ते गौरवण्यात आले होते.  समृद्धीने आत्तापर्यंत दोनशेपेक्षा जास्त चषक, पदक व प्रमाणपत्रांची कमाई केली आहे.  तिच्या या यशामध्ये तिचे वडील  दत्तात्रय , आई  सुमन व भाऊ  सारंग यांचे कायम प्रोत्सहन तसेच पाठबळ मिळाले आहे.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share