BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : पिंपरी-चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे दुसरे पोलीस आयुक्त म्हणून भारतीय पोलीस सेवेतील संदीप बिष्णोई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पहिले पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांची बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आज (शुक्रवारी) गृह विभागाकडून काढण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय 15 ऑगस्ट 2018 रोजी सुरु झाले. या आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून आर के पद्मनाभन यांनी पदभार घेतला. ऑक्टोबर 2019 मध्ये ते सेवानिवृत्त होणार आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुका असल्याने सेवानिवृत्तीपूर्वी एक महिना त्यांची बदली करण्यात आली आहे. तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे दुसरे पोलीस आयुक्त म्हणून संदीप बिष्णोई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप बिष्णोई वैधमापनशास्त्र, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे नियंत्रक म्हणून कार्यरत आहेत.

आर के पद्मनाभन यांच्या बदलीचे ठिकाण अद्याप दिले नाही. त्यांच्या पदस्थापनेबाबत नव्याने आदेश काढण्यात येणार आहेत. तर संदीप बिष्णोई यांच्या वैधमापनशास्त्र, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे नियंत्रक पदाचा अतिरिक्त कार्यभार गृह विभागाचे विशेष सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांच्याकडे देण्यात आला आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3