BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : संजय नाईक-पाटील यांची पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर बदली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त संजय भाऊसाहेब नाईक-पाटील यांची नियुक्ती केली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने याबाबतचा आदेश गुरुवारी (दि. 11) दिला आहे.

राज्य शासनाने भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील 101 पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्तांची बदली केली आहे. तर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आणि परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. गृह विभागाने याबाबतचा आदेश आज (गुरुवारी) काढला आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी एक सहाय्यक पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • संजय भाऊसाहेब नाईक-पाटील यापूर्वी सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होते. ते बार्शी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा कार्यभार त्यांच्याकडे होता. राज्य शासनाने त्यांची बदली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात केली आहे.
HB_POST_END_FTR-A2

.