Chinchwad : संतनगर मित्र मंडळाला निसर्गप्रेमी पर्यावरण देखावे विभागात प्रथम पारितोषिक

एमपीसी न्यूज- श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने 2018 मध्ये घेण्यात आलेल्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये भोसरी येथील संतनगर मित्र मंडळाला निसर्गप्रेमी पर्यावरण देखावे विभागात प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी (दि. 8) चिंचवड येथे प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आला. यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, अमर साबळे, महापौर राहुल जाधव, माजी खासदार गजानन बाबर, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राहुल कलाटे, दत्ता साने, उद्योजक राजीवकुमार साकला, आण्णाभाऊ साठे मंडळ अध्यक्ष अमित गोरखे, दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.