Chinchwad : संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 180 जणांवर शनिवारी कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 180 जणांवर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी कोरोनाचे आणखी सहा रुग्ण आढळले. यामुळे आत्तापर्यंत करोना बाधितांची एकूण संख्या 21 वर गेली आहे. त्यापैकी 12 जण करोना मुक्‍त झाले आहेत. मात्र, नव्याने रुग्ण आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. करोनावर मात करण्यासाठी संचारबंदीच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

मात्र, तरीदेखील अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसून येतात. शनिवारी (दि. 4) पोलिसांनी तब्बल 180 जणांवर संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. तरीदेखील काही टवाळखोर रस्त्याने फिरताना दिसतात. करोना रुग्णांची संख्या वाढल्याने शहरवासियांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • शनिवारी केलेली कारवाई :
    आळंदी – 09
    वाकड – 15
    तळेगाव एमआयडीसी – 02
    हिंजवडी – 23
    निगडी – 18
    देहूरोड – 29
    सांगवी – 04
    एमआयडीसी भोसरी – 26
    पिंपरी – 06
    भोसरी – 09
    चाकण – 06
    चिंचवड – 16
    दिघी – 11
    तळेगाव दाभाडे – 06
    एकूण – 180

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.