Chinchwad: ‘महिलांमधील अकाली वृद्धत्वाची समस्या व घ्यावयाची काळजी’ या विषयावर रविवारी व्याख्यान

एमपीसी न्यूज – जागतिक महिलादिनानिमित्त पिंपरी-चिंचवड सायन्सपार्कमध्ये उद्या (रविवारी) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या सह प्राध्यापिका डॉ. रंजीता चटर्जी यांचे  ‘महिलांमधील अकाली वृद्धत्वाची समस्या व घ्यावयाची काळजी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

सायन्सपार्कमध्ये रविवारी सकाळी पावणेअकरा वाजल्यापासून विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. पावणेअकरा वाजता परिसर पर्यावरण व स्वच्छता शालेय प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. 14 मार्चपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. सकाळी अकरा वाजता  डॉ. चटर्जी यांचे  ‘महिलांमधील अकाली वृद्धत्वाची समस्या व घ्यावयाची काळजी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

पावणेबारा वाजता निगडीतील ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या बी.के.सुवर्णा यांचे ‘महिलांच्या दिनचर्येत राजयोगाचे महत्व’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता विज्ञान प्रात्यक्षिक स्पर्धा होणार आहेत. सर्व कार्यक्रमांना विनामूल्य प्रवेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.