Chinchwad : ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक प्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा

एमपीसी न्यूज- कराराप्रमाणे दुकान आणि पहिल्या मजल्यावर फ्लॅट न देता तसेच मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम न करता एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिंचवड येथे घडली.

राजेंद्र पंडितराव सराफ (वय 50, रा. गांधीपेठ, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. दत्तात्रय मोरेश्‍वर रबडे (वय 93, रा. आयबीएल कॉलनी, कोथरूड, पुणे) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारी 2004 ते 12 ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत ही घटना चिंचवडगाव येथे घडली. फिर्यादी रबडे यांनी आपली जमीन करारनामा करून आरोपी सराफ यांना विकसित करण्यासाठी दिली होती. सराफ याने महापालिकेने मंजूर केलेल्या नकाशाप्रमाणे बांधकाम केले नाही. तसेच करारनाम्यात ठरल्याप्रमाणे रबडे यांना एक दुकान आणि पहिल्या मजल्यावर फ्लॅट न देता फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक दिघे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.