Chinchwad : ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन सोहळा साजरा

एमपीसी न्यूज – श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या अंतर्गत श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ शिवतेजनगर यांचा सहावा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी नुकताच साजरा करण्यात आला.

यावेळी आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे उपस्थित होते. मारुती यादव यांचा हास्यकल्होळ एकपात्री प्रयोग झाला. लग्नाला 50 वर्ष पूर्ण झालेल्या दांम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक हेच खरे आपल्या मुलाला संस्कार देत असतात. जुन्या परंपरा तसेच कुटुंब पद्धत जपावी असे, आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरिनारायण शेळके, भाऊसाहेब कोकाटे, श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चना तोंडकर, संतोष शेळके, मंगेश पाटील, अंजली देव, नीलिमा भंगाळे, प्रिया गायकवाड, मेघराज बागी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका सारिका रिकामे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.