Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आणखी सात पोलीस कोरोनाबाधित

Seven more police coroned at Pimpri Chinchwad Police Commissionerate

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कोरोनाचा आकडा वाढत आहे. आज (बुधवारी) आणखी सात पोलिसांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे कोरोना झालेल्या पोलिसांची संख्या 24 एवढी झाली आहे.

आज पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या पोलिसांमध्ये तीन अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

मागील दोन दिवसांपूर्वी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्या संपर्कातील सर्व पोलिसांची चाचणी करण्यात आली.

त्यामध्ये सहा पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर अन्य एका पोलीस ठाण्यातील एका पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशा एकूण सात पोलिसांचा अहवाल एकाच दिवशी पॉझिटिव्ह आला आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आजवर 24 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या रुग्णालयात 8 पोलीस उपचार घेत आहेत. तर 18 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

डिस्चार्ज दिलेले बहुतांश पोलीस संपूर्ण उपचारानंतर पुन्हा कर्तव्यावर रुजू देखील झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like