Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवड परिसरातून दोन लाख 84 हजारांच्या सात दुचाकी चोरीला

शहरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून नागरिकांना चोरट्यांनी हैराण करून सोडले आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 84 हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत शनिवारी (दि. 12) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून नागरिकांना चोरट्यांनी हैराण करून सोडले आहे.

चाकण पोलीस ठाण्यात दोन वाहन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील पहिल्या प्रकरणात मिलिंद शंकर आडे (वय 30, रा. बिरदवडी राधानगरी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. आडे यांची दहा हजारांची दुचाकी (एम एच 29 / ए यु 1714) चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. हा प्रकार 10 सप्टेंबर रोजी उघडकीस आला. तर दुस-या प्रकरणात धनंजय सुरेश थिगळे (वय 28, रा. वरची भांबुरवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. थिगळे यांची 25 हजारांची दुचाकी (एम एच 14 / बी जी 8328) 10 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते रात्री सात वाजताच्या कालावधीत चोरट्यांनी शिंदे येथील किंग्फर कंपनीच्या गेट समोरून चोरून नेली आहे.

सुदर्शन तानाजी उबाळे (वय 30, रा. गंधर्वनगरी, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उबाळे यांची 15 हजारांची दुचाकी (एम एच 14 / बी झेड 8213) इंद्रलोक कॉलनी क्रमांक चार, मोशी येथून चोरट्यांनी चोरून नेली आहे.

राम जालिंदर बन (वय 56, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी बन यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / सी क्यू 2850) घरासमोर पार्क केली होती. चोरट्यांनी घरासमोरून त्यांची दुचाकी चोरून नेली.

राजू काशिनाथ वाकोडे (वय 45, रा. काळेवाडी, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी वाकोडे यांची देखील 59 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / एच एक्स 9535) त्यांच्या घरासमोरून चोरून नेली आहे.

अभिजित दशरथ हिरे (वय 27, रा. डोळसनाथ मंदिराच्या शेजारी, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हिरे यांची 20 हजारांची दुचाकी (एम एच 14 / जी क्यू 2767) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 11) पहाटे पाच वाजता उघडकीस आला.

संदीप गणेश कांबळे (वय 33, रा. गणेशनगर, चिखली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कांबळे यांनी त्यांची एक लाख 40 हजार रुपये किमतीची रॉयल इनफिल्ड बुलेट (एम एच 14 / जे बी 1410) 10 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता आंबेडकर चौक, पिंपरी येथे मनवाणी मशीन टूल्सच्या जवळ पार्क केली होती. दिवसभरात अज्ञात चोरट्यांनी त्यांची बुलेट चोरून नेली. हा प्रकार रात्री पावणे आठ वाजता उघडकीस आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.