Chinchwad : ज्येष्ठ गायक शरद शिधये यांचे निधन

एमपीसी न्यूज- तानसेन संगीत विद्यालयाचे प्रमुख, अभ्यासू गायक वादक शिक्षक शरद शिधये (वय 52) यांचे आज पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा निषाद असा परिवार आहे. शरद शिधये हे टाटा मोटर्सच्या विद्यानिकेतन स्कूलमध्ये संगीत शिक्षक म्हणून काम करीत होते.

शिधये हे स्वतः उत्तम संवादिनी वादक आणि शास्त्रीय गायक होते. चिंचवडगावातील तानसेन संगीत विद्यालयात ते गायन वादन शिकवत असत. शिधये यांच्या घराण्यात संगीताची परंपरा असून शरद शिधये यांचे वडील देखील संगीत शिक्षक होते आणि मुलगा निषाद हा उत्तम तबला वादक असून तो संगीताच्या अनेक कार्यक्रमात साथसंगत करतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.