Chinchwad : सोहम सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिकेत शिवजयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती साजरी होत (Chinchwad) आहे. त्या निमित्ताने संत तुकाराम नगर येथील सोहम सार्वजनिक ग्रंथालय व अभ्यासिका या संस्थेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदू कदम व संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

सोहम अभ्यासिकेतून प्रशासकीय सेवेसाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुजित पाटील (सार्वजनिक बांधकाम विभाग) यांची निवड करण्यात आल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांनी प्रास्ताविक केले.

 

संकटांना न डगमगता लढण्याची उमेद जागी ठेवून आपण रणांगणात खंबीरपणे आलेल्या संकटांचा सामना करण्यासाठी ठामपणे उभे राहिलो तर गमावलेलं सगळं काही परत जिंकता येतं हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकायला मिळतं.

नंदू कदम व संतोष म्हात्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्बोधक गोष्टी सांगितल्या. प्रदीप बोरसे यांनी सूत्रसंचलन केले. ग्रंथालयाच्या (Chinchwad) ग्रंथपाल वर्षा बोरसे यांनी आभार मानले. याप्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.