Chinchwad : शिवछत्रपती विद्यालयाने केरळ पूरग्रस्तांसाठी उभा केला 75 हजाराचा निधी

एमपीसी न्यूज – केरळ आपत्तीसाठी 75 हजार रुपयांचा निधी उभा करुन चिंचवडमधील श्री शिवछत्रपती शिवाजी राजे विद्यालयाने सामाजिक जबाबदारीचा आदर्श घालून दिला.

केरळ आपत्तीसाठी विद्यार्थी, शिक्षकांनी स्वेच्छेने मदत करण्याचे आवाहन विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी केले. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांनी तात्काळ 37 हजार 749 रुपयांचा निधी संकलित केला. त्यात आपला वाटा म्हणून जाधव यांनी स्वतःकडील 37 हजार 260 रुपये दिले.

जमा झालेला 75 हजाराचा रोख निधी पाठविण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक बाळाराम पाटील, पर्यवेक्षक अनिल कर्पे, उपमुख्याध्यापक किसन अहिरे, मुख्याध्यापक भाऊसाहेब पगार आदी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.