BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : रस्टन कॉलनीतील कचरा न उचलल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार – संतोष सौंदणकर

एमपीसी न्यूज – पवनानगर रस्टन कॉलनी प्रभाग क्रमांक 18 मधील कचरा त्वरीत न उचल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे चिंचवड विधानसभेचे संघटक संतोष सौंदणकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे दिला आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्र. 18 मधील रस्टन कॉलनी, पवनानगर या भागात कचरा साफ करणाऱ्या कर्मचा-यांकडून नित्य – नियमाने स्वच्छतेची कामे चांगल्या प्रकारे होत असताना या भागात मोठ्या प्रमाणात झाडे असल्याने त्यांनी लावलेला पाला-पाचोळा व इतर कचरा हे कर्मचारी रस्त्याच्या कडेला लावत असतात. अतिशय नेटाने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्वरित कचरा गाड्या उपलब्ध होत नसल्याने कचऱ्याचे ढीगच्या ढीग नाईलाजास्तव जमा होत आहेत. त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढले आहे.

  • या ठिकाणी कचरा उचलणाऱ्या गाड्या आपल्या अखत्यारीत असलेल्या ‘ब’प्रभाग प्रशासनाकडून त्वरित उपलब्ध होत नसल्याने कचऱ्याचे समस्या या भागात गंभीर होत चालली आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक पाहणे गरजेचे आहे. तसेच तेथील कचरा वेचक कर्मचा-यांना त्वरित गाड्या उपलब्ध करून देणे संबंधी योग्य ते आदेश संबंधित खात्यास आपण द्यावेत. अन्यथा, शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असेही म्हटले आहे.
HB_POST_END_FTR-A2

.