Chinchwad Crime News : धक्कादायक ! पोलीस आयुक्तालयाजवळ कोयत्याने वार करत तरुणाची बॅग हिसकावली

एमपीसी न्यूज – तरुणावर कोयत्याने वार करत तीन जणांनी मिळून तरुणाच्या हातातील बॅग आणि बॅगेतील ऐवज हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 14) रात्री पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालय असलेल्या प्रेमलोक पार्क ते बिजलीनगर पाणवठा या दरम्यान घडली.

शैलसिंग मोहनसिंग (वय 29, सध्या रा. पंचरत्न कॉलनी, वाल्हेकवाडी. मूळगाव रेवंदर, जि. सिरोई, राजस्थान) असे चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादनुसार दुचाकीवरील तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शैलसिंग हे रविवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून चालले होते. बिजलीनगर ते प्रेमलोक दरम्यान दुचाकीवरून तीन चोरटे आले. त्यांनी शैलसिंग यांच्या खांद्याला लावलेली बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

शैलसिंग यांनी त्यांना विरोध केला असता चोरट्यांनी त्यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांची 250 रुपयांची बॅग, 33 हजारांची रोकड आणि सात हजारांचा मोबाइल फोन असा एकूण 40 हजार 250 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.