Chinchwad : प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य भागातील दुकाने सुरू राहतील, पण …

एमपीसी न्यूज – प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) म्हणून घोषित केलेल्या परिसराव्यतिरिक्त अन्य भागातील एकाकी दुकाने लॉकडाऊन 3.0 मध्ये सुरू राहतील. पण, एका रस्त्यावर अत्यावश्यक सेवेतील दुकानांव्यतिरिक्त पाच पेक्षा अधिक दुकाने असतील तर त्यातील केवळ पाचच दुकाने सुरू राहतील, असे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. कोणती पाच दुकाने सुरू ठेवायची याबाबत महापालिका प्रभाग कार्यालय, नगरपरिषद अथवा संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडून परवानगी घ्यावी, असेही आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

लॉकडाऊन 3.0 सोमवार (दि. 4) पासून सुरू झाला आहे. पुढील दोन आठवडे (17 मे पर्यंत) हा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. मागील एक ते दीड महिन्यापासून अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य दुकाने बंद होती. त्या दुकानांना सवलत मिळावी, तसेच लॉकडाऊन नंतर सर्व परिस्थिती पूर्वपदावर यावी, यासाठी काही भागात काही दुकाने, सेवा, उद्योग, कारखाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शहरातील व्यापाऱ्यांमध्ये दुकाने सुरू करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व मॉल, व्यापारी संकुले, मार्केट हे लॉकडाऊनच्या काळात बंद राहणार आहे. या बाजारपेठा, व्यापारी संकुलातील अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने सकाळी 10 ते दुपारी चार या वेळेत सुरू राहतील. प्रतिबंधित क्षेत्र वगळता एकाकी दुकाने, नागरी वसाहतीतील दुकाने, नागरी संकुलातील दुकाने सकाळी 10 ते दुपारी चार या वेळेत सुरू राहतील.

एका रस्त्यावर, गल्लीत अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने वगळून अन्य दुकाने पाच पेक्षा कमी असतील तर ती दुकाने सुरू राहतील. पाच पेक्षा जास्त दुकाने असतील तर त्यातील केवळ पाच दुकाने सुरू राहतील. ही पाच दुकाने कोणती सुरू राहतील, याबाबत स्थानिक प्रशासन (उदा. महापालिका क्षेत्रीय कार्यालय, नगरपरिषद कार्यालय आदि) कार्यालयातून परवानगी काढावी लागेल, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

शहरातील कंटेन्मेंट झोन –
# खराळवाडी परिसर, पिंपरी –
जामा मस्जिद, खराळवाडीतील गिरमे हॉस्पिटल, अग्रेसन लायब्ररी, क्रिधा ट्रेडर्स, चैताली पार्क हौसिंग सोसायटी, खराळ आई गार्डन, ओम हॉस्पिटल, ओरियंटल बँक, सिटी प्राईड हॉटल, क्रिस्टल कोर्ट हॉटेल, गिरमे हॉस्पिटल

# पीएमटी चौक, भोसरी –
पाटील हॉस्पिटल, पीएमटी चौक, मारुती मंदिर, पीसीएमसी पाणी टाकी, भोसरी जुने हॉस्पिटल, विश्वविलास बिर्याणी हाऊस

# गुरुदत्त कॉलनी, भोसरी-
भोसरी- आळंदी रोड, बिकानेर स्वीटस्‌, एच पी पेट्रोल पंप, बालाजी मंदिर, भारत पेट्रोल पंप, दुर्वांकुर लॉन मागील बाजू, न्यु मिलान बेकरी, हरी ओम स्वीट, महा-ई सेवा केंद्र, ममता स्वीट, आनंद हॉस्पिटल

# रामराज्य प्लॅनेट परिसर, कासारवाडी –
सीएमई हद्द, सेवन ऍप्पल हॉटेल, सिद्धार्थ मोटर्स, मुंबई पुणे हायवे, दत्त मंदिर, पोस्ट ऑफिस

# गणेश नगर परिसर, दापोडी-
पाण्याची टाकी, रेल्वे लाईन, सिध्दी टॉवर्स, माता शितलादेवी चौक, श्रेया एंटरप्रायजेस, न्यू मिलेनियम इंग्लिश स्कुल

# शास्त्री चौक, भोसरी-
संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा, परफेक्‍ट इलेक्‍ट्रिल, व्यंकटेश मेडिकल, महानगर को ऑप. बँक, भोसरी आळंदी रोड

# तनिष्क ऑर्किड, चऱ्होली –
तनिष्क ऑर्किड सोसायटी हद्द

# कृष्णराज कॉलनी, पिंपळे गुरव –
पवना नदी किनारा, दत्त मंदिर, बालाजी हॉटेल, भारत गॅस एजन्सी, पवना नदी किनारा

# नेहरुनगर बस डेपो, नेहरूनगर –
जनता सहकारी बँक, नूरानी मस्जिद, पवार पेट्रोल पंप, हैद्राबादी बिर्यानी हाऊस

# कावेरीनगर पोलीस लाइन, वाकड –
बीएसएनएल टेलिफोन एक्‍सचेंज, सेसेम शाळा रस्ता, इंफन्ट जेसस हायस्कूल, अण्णाभाऊ साठे नगर

# रुपीनगर–तळवडे –
दिपक ग्लास सेंटर, स्वामी समर्थ मठ, त्रिवेणी चौक, भक्ती – शक्ती बस डेपो

# गंधर्वनगरी परिसर, मोशी –
जय हनुमान ट्रेडर्स, हॉटेल सूर्योदय, पीएएमयू हायड्रोलिक्स, मोशी कचरा डेपो, पुणे नाशिक हायवे

# विजयनगर परिसर, दिघी –
शिवशंकर आपार्टमेंट, समायक गॅस एजन्सी, गणेश सुपर मार्केट, राघव मंगल कार्यालय, संत ज्ञानेश्वर रोड, व्ही आर एल कुरिअर सर्व्हिस

# तनिष्क आयकॉन परिसर, दिघी –
पाण्याची टाकी, कृष्ण आंगण कॉमप्लेक्‍स, ओम साई मिसळ, आळंदी रोड, सुदामा भेळ

# मधुबन सोसायटी परिसर, जुनी सांगवी –
मुळा नदी, सीक्‍यूएई परिसर, कामटे फुड्‌स, गणेश मंदिर, इंडियन ऑईल पेट्रोल पंप

# तपोवन रोड परिसर , पिंपरी वाघेरे –
सुखवानी सिटी, व्होडाफोन स्टोअर, नंद किराणा स्टोअर्स, ज्ञानेश्वर जनरल स्टोअर्स, कापसे चौक , वाडेकर मिसळ

# 16 नंबर बसस्टॉप परिसर, थेरगाव –
औंध रावेत बीआरटी रोड, प्रोबस सॉफ्टवेअर प्रा. लि., अक्षय पार्क सोसायटी , प्रेम कुल्फी सेंटर

# शिवाजी चौक परिसर, पिंपळे निलख –
एस. एस. फर्निचर, गुरुदत्त मेडीकल, बाबुराव कामठे चौक, पाण्याची टाकी, बाबसाहेब आंबेडकर पथ, कांबळे प्रॉपर्टीज

# इंदिरा नगर परिसर, चिंचवड
बीएसएनएल स्टाफ कॉर्टर भिंत, महिंद्रा टू व्हीलर, चिखली कस्पटे वस्ती बीआरटीएस रोड, सरस्वती को-ऑप. बॅंक, डबल ट्री हिल्टन, कॉर्पोरेशन बॅंक, एएसएमएस कॉलेज, तेजस एंटरप्रायजेस, सायन्स पार्कच्या मागील बाजू

# शुभश्री रो हाऊस परिसर, पिंपळे सौदागर –
कुणाल आयकॉन रोड, एमएसईबी ऑफिस, ओम दत्तराज मंदिर, रोज वुड सोसायटी, सोमनाथ स्क्रॅप सेंटर, ओमचैतन्य डेअरी, पकवान स्विटस

# साठ फुटी रोड, पिंपळे गुरव-
तुळजा भवानी मंदिर, भालचंद्र हॉस्पिटल, निलम सुपर मार्केट, गणेश मंदिर, माऊली हॉटेल, श्रीगणेश डेअरी, जयश्री स्वीटस

# देहूरोड छावणी परिषद
देहूरोड छावणी परिषद परिसर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.