Chinchwad : रौप्य महोत्सवी कीर्तन प्रशिक्षण शिबिर उत्साहात

एमपीसी न्यूज – चिंचवड येथे रौप्य महोत्सवी कीर्तन प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिराचे उदघाटन चिंचवड देवस्थान ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त मंदार देव महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वेदमूर्ती श्रीनिवास करंबळेकर यांचे वेदोक्त आशिर्वाद लाभले.

उदघाटनानंतर हभप दीपकबुवा रास्ते यांनी शिबिरार्थींना कीर्तनाचे मंगलाचरण, पूर्वरंग यांची माहिती दिली. श्रुती आपटे यांनी चरित्रामधील संस्कृत श्लोक व सुभाषिते अर्थासह शिकविली.

  • यावेळी संजय मुथा, नंदु गुरव पालक उपस्थित होते. या शिबिर कालावधीत श्रीराम खांडेकर (संवादिनी), रघुवीर केंच, अपर्णा दिवेकर (तबला) यांनी साथसंगत केली.

प्रशिक्षण शिबिरात 7 ते 72 वयोगटाचा समावेश होता. याज्ञिकी जोशी, स्नेहल पळसोदकर, कुमुदिनी घोडके, श्रीराम खटावकर, सुमेधा भावे, ऋचा पाटील, नीला सिधये, जयश्री सबनीस, मल्हार प्रभुमिराशी, ऋुतुजा केंच, दिक्षा अभ्यंकर, प्राची आठल्ये, सुवर्णा कुलकर्णी, वंदना कापरे, मयुरी घेवारी, वैशाली आवटे, गौरव निर्मळ, प्रेमचंद नारखेडे, आदिती गोसावी, वज्रेश्वरी घुले, वासंती जोशी, वैशाली खोले, निलम शिंदे, अॅड. हरिश्चंद्र सुरवसे, अरुणा रायकर आदी सहभागी झाले होते.

  • या शिबिरार्थींना आयुर्वेद तज्ञ गिरीष गांधी, संगीततज्ञ मुकुंद श्रोत्री, पाठांतर संचालिका श्रुती आपटे तसेच विठ्ठल मंदिर ट्रस्टचे सल्लागार धोंडीराम सायकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.