Chinchwad : तारांगण प्रकल्पाचे दररोज सहा शो

एमपीसी न्यूज – महापालिका निर्मित चिंचवड येथील सायन्स पार्क परिसरातील (Chinchwad )वैशिष्ट्यपूर्ण तारांगण तारांगणमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेत दररोज सहा शो होणार आहेत.
पहिला शो सकाळी 11 वाजता सुरू होतो. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषांमधून हे शो दाखविले जातात. सध्या उन्हाळी सुट्टी असल्याने महाराष्ट्रातील विविध भागातील मुले तारांगण व सायन्स पार्क पाहण्यासाठी येत आहेत. त्यामुळे 2 ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी तारांगण व सायन्स पार्क पाहण्याकरिता 80 रूपये, 12 वय वर्षांपुढील 20 जण असलेल्या मुलांच्या ग्रुपसाठी 140 रूपये, इतर नागरिकांसाठी सायन्स पार्कला 60, मुलांसाठी 30 तर तारांगणसाठी 100 आणि मुलांसाठी 80 रूपये तिकीट दर आहे. तारांगण प्रकल्प एकट्याला दाखविला जात नाही. ग्रुपमध्ये हा शो दाखविला जातो. एकावेळी 120 जण तारांगणचा शो पाहू शकतात.
Alandi : चंद्रशेखर बावनकुळे यांची राम गावडे यांच्या निवासस्थानाला सदिच्छा भेट
ऑप्टोमेकॅनिकल व डिजीटल पद्धतीच्या माध्यमातून हायब्रिड प्रोजेक्शन पद्धतीचे अत्याधुनिक तारांगण विकसित केलेले आहे. तारांगण प्रकल्प दोन हजार 410 चौरस मीटर क्षेत्रफळात विकसित करण्यात आलेला आहे. तारांगण प्रकल्पात ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांचा सहभाग असलेल्या समितीचे मार्गदर्शन प्राप्त झाले आहे. 15.7 मीटर व्यासाच्या या तारांगणामध्ये 122 आसन क्षमता आहे. खगोलविज्ञानातील 17 वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम फित जपान येथील गोटो कंपनीच्या सहाय्याने तयार केलेले आहेत. या व्यतिरिक्त 100 आसन व्यवस्थेचे स्वतंत्र सभागृह सुविधा उपलब्ध (Chinchwad ) आहे.