Chinchwad: चाकण, पिंपरी, हिंजवडी, तळेगाव परिसरातून सहा वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – चाकणमधून एक टेम्पो, पिंपरी मधून मोपेड दुचाकी, हिंजवडी मधून तीन दुचाकी आणि तळेगाव दाभाडे मधून एक दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 15) अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

चाकण पोलीस ठाण्यात टेम्पो चोरी प्रकरणात गौतम खंडू कदम (वय 42, रा. चिंचवड) यांनी फिर्यादी दिली आहे. फिर्यादी कदम यांनी त्यांचा 65 हजार रुपये किमतीचा टेम्पो (एम एच 14 / सी पी 9182) शनिवारी (दि. 15) पहाटे एक वाजताच्या सुमारास खराबवाडी येथील इंडिअन ऑईल पेट्रोल पंपावर पार्क केला होता. अज्ञात चोरट्यांनी त्यांचा टेम्पो चोरून नेला. हा प्रकार सकाळी साडेदहा वाजता उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

पिंपरी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी प्रकरणी मनोज सुनील तीर्थानी (वय 21, रा. रिव्हर रोड, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी मनोज यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच 14 / सी आर 9974) शुक्रवारी (दि. 14) पहाटे घरासमोर पार्क केली होती. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून चोरून नेली. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यातील पहिल्या घटनेत आनंद सेलवम (वय 27, रा. येळवंडे वस्ती, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची एक लाख रुपये किमतीची केटीएम ड्युक दुचाकी (एम एच 12 / आर जे 7629) त्यांच्या घराच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. 13 ऑगस्ट रोजी हा प्रकार उघडकीस आला.

वाहन चोरीच्या दुस-या प्रकरणात रवींद्र अजित नखाते (वय 32, रा. वाकडकर वस्ती, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी नखाते यांनी त्यांची 90 हजार रुपये किमतीची बुलेट (एम एच 14 / ई टी 8800) 10 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 11 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आला.

वाहन चोरीच्या तिस-या प्रकरणात आनंद पुखराज सुराणा (वय 33, रा. बावधन बुद्रुक, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुराणा यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची होंडा सीडी डिलक्स दुचाकी (के ए 55 / एच 5733) 16 जून रोजी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 2 ऑगस्ट रोजी उघडकीस आला. वरील तिन्ही गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात निखील किसन दाभाडे (वय 35, रा. जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी दाभाडे यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी 10 ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता जिजामाता चौकातील त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. भर दिवसा त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार त्याच दिवशी दुपारी साडेचार वाजता उघडकीस आला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.