Chinchwad : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फराळ वाटप

एमपीसी न्यूज – आषाढी एकादशीनिमित्त वाल्हेकरवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फराळ वाटप करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते तानाजी वाल्हेकर, मंडळाचे अध्यक्ष नथूशेठ वाल्हेकर, धनंजय वाल्हेकर, सागर वाल्हेकर, राजु वाल्हेकर, बाबु नढे, शैलेश चव्हाण, सचिन यादव, चेतन वाल्हेकर, विकास वाल्हेकर, सुरज वाल्हेकर, हर्षल बाबर आदी उपस्थित होते.

वाल्हेकरवाडी मधील ग्रामस्थांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भजन केले. सर्वजण विठूनामाच्या गजरात रंगून गेले. यावेळी मंदिरामध्ये दोन ते अडीच हजार भाविकांनी दर्शन घेतले. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील फराळ वाटप करण्यात आले. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.