Chinchwad – स्नेहमेळाव्यामुळे मुलांमध्ये स्वप्ने बघण्याची जिद्द निर्माण होते – पूजा बीरारी

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल (Chinchwad) संचलित प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज (केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड) मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. मुलांना महाराष्ट्राची संस्कृती कळावी, त्याला उजाळा मिळावा. यासाठी मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हिस यांच्या नेतृत्वाखाली 850 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभागातून पारंपारिक वेशभूषा परिधान करून महाराष्ट्राची लोकधारा या विषयावर महाराष्ट्राची परंपरा सादर केली.

त्यात गणेश वंदना, गवळण, उदे गं अंबे उदे, भक्तीगीते, धनगर गीत, मल्लखांब, कोळी नृत्य, भारूड, गोंधळ, दहीहंडी, पालखी सोहळा, लावणी आदी लोक संगीतामधील अस्सल सुश्राव्य गीत प्रकार, नाटीका, नृत्याच्या माध्यमातून धमाल उडवून दिली. लावणी कार्यक्रमात तर, सिनेअभिनेत्री पुजा बिरारी हिने, देखील नृत्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवून उपस्थितांना अचंबित केले.

तसेच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीमधील अनेकप्रसंग पारंपारिक वेशभूषा करून विद्यार्थ्यांना अभिनयाच्या माध्यमातून विविध प्रसंग सादर करून उपस्थितांची मने जिंकली, यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जय घोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला. उपस्थित पालक, शिक्षक तसेच, प्रमुख पाहुण्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांच्या आनंद गगनात मावेनासा झाला होता.

Pune News : EPFO तर्फे कामगार दिनानिमित विशेष वेबिनार!

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सिनेअभिनेत्री पुजा बिरारी व आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. व्यासपीठावर यावेळी प्रमुख पाहुणे उद्योजक वर्धमान जैन, सतीश देसाई, अभिनेता देवेंद्र गायकवाड, किरण गायकवाड, युट्युबर इन्फ्युयन्सर तुषार खैर, कमला शिक्षण संकुलाच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, संस्थापक सचिव दीपक शहा, खजिनदार भूपाली शहा, शैलेश शहा, अनुप शहा, प्राचार्य बाबासाहेब सांगळे, मुख्य प्रशासकिय अधिकारी राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या क्षितीजा गांधी, वनिता कुर्‍हाडे, मुख्याध्यापिका सविता टॅ्रव्हिस आदीच्या उपस्थितीत सिनेअभिनेत्री पुजा बिरारी हिच्या हस्ते भारतातील प्रथम ई-स्कुटर चालवीत गाडीचे अनावरण करण्यात आले.

विविध स्पर्धेत तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. शालेय विविध कार्यक्रमातून जमा झालेल्या देणगीतून आश्रमांस देणगी स्वरूपात काही रक्कम सन्मानपूर्वक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

सिनेअभिनेत्री पुजा बिरारी म्हणाल्या, माझी नाट्यक्षेत्रातील कारकिर्दीची सुरूवात टि.व्ही. सिरीयल मधून झाली. माझ्या शालेय कारकिर्दीत मी देखील माझ्या शाळेत स्नेहसंमेलनमध्ये सहभाग घेत (Chinchwad) होते. पालकांना व मुलांना उद्देशून म्हणाल्या स्वप्न बघण्यात जिद्द असेल तरच पूर्ण करता येतात. स्नेहसंमेलनामुळे मुलांमध्ये स्वप्न बघण्याची जिद्द जागी होते. उद्या तुमच्यातील यशस्वी कलाकार निर्माण व्हावेत, अशी शुभेच्छा यावेळी दिल्या.

संस्थाचालक दीपक शहा मुलांच्या शिक्षणाबरोबर सुप्त कलागुणांचा विकास व्हावा, यासाठी जातीने लक्ष देत आहेत. त्यांना प्रोत्साहन देत आहे. ही कौस्तुकास्पद बाब आहे. सतिश देसाई म्हणाले, लहान मुलांनी सामाजिक बांधिलकी दाखविली रक्कम महत्त्वाची नाही, भावना महत्त्वाची आहे. उद्योजक वर्धमान जैन म्हणाले, आपली संस्कृती बोलताना वागताना, राहणी मानात दिसून येते, आजची युवा पिढी पाच्चिमात्य तंत्रज्ञान आत्मसात करून आपला वेगळा ठसा निर्माण करू पहात आहे.

विद्यार्थ्यांनी आपले योग्य आहार, व्यायाम, सराव, जिद्द, चिकाटीच्या जोरावर भविष्यात यशस्वी व्हा, असा कानमंत्र यावेळी दिला.
संस्थेचे सचिव दीपक शहा, पालकांना उद्देशून म्हणाले, महाराष्ट्राची लोकधारासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍याची अथक परिश्रम घेतले. पालकांचे विशेष आभार मानून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.