Chinchwad : संस्कार प्रतिष्ठानची सामाजिक बांधिलकी; २५० कुटुंबांना किराणा व भाजीपाल्याचे वाटप

एमपीसी न्यूज : संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंंचवड शहर यांच्या वतीने रावेत येथील रमाबाई नगर धुणे-भांडी करणाऱ्या ६ कुटुंबांना व चिंंचवडेनगरच्या दगडोबा चौक चौकातील बांधकाम मजूर व प्लंबरचे काम करणाऱ्या मजुरांच्या १४ कुटुंबांना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून १४ तारखेपर्यंत पुरेल एवढे साहित्य गोरगरिबांना देण्यात आले आहे.

प्रतिष्ठानच्यावतीने काही गरजूंना घरी बोलाऊन जीवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन गायकवाड, रमेश भिसे, मिलन गायकवाड, रंजना जोशी, सिध्दी जोशी, सोनाली कांबळे, रितेश घोडके यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले.

प्रतिष्ठानच्या वतीने आतापर्यंत २५० कुटुंबांना किराणा आणि भाजीचे वाटप करण्यात आले आहे. यापुढेही पिंपरी चिंचवड शहरातील मजूर, हातावर पोट असणारी कुटुंबे आणि गरजूंना घरपोहोच किरणा व भाजीपाला पोहोच करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मेहनत घेत असल्याची माहिती मोहन गायकवाड यांनी दिली.

करोनाबाबत जनजागृती अभियान

संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंंचवड शहर आणि चिंंचवड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करोनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. हे अभियान १४ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे. यामध्ये चिंंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत चिंंचवडगाव, काकडेपार्क, श्रीधरनगर, प्रेमलोक पार्क, दळवीनगर, बिजलीनगर, आकुर्डी स्टेशन, वाल्हेकरवाडी,आहेरनगर, चिंतामणी गणेश मंदिर परिसर, चिंंचवडेनगर, रस्टन कॉलनी या परिसरात कोरोनापासून बचाव करण्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.