Chinchwad : गुरुकृपा सहकारी संस्थेमधील सोलर सिस्टिमचे खासदार बारणे यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज – चिंचवडगाव येथील रस्टन कॉलनीतील गुरुकृपा सहकारी संस्थेमध्ये सोलर सिस्टिमचे लोकार्पण मावळचे खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगरसेवक अश्विनी चिंचवडे, अपर्णा डोके, राजेंद्र गावडे व सुरेश भोईर व शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे आदी उपस्थित होते. संतोष सौंदणकर यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प राबविण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजित डोईफोडे ,सचिव अंजुम मुलाणी, मारुती केवले, दत्तात्रेय मोशीकर, गणेश क्षीरसागर, बाळासाहेब नवले, सुभाष मालुसरे, सचिन टुले इतर सर्व सभासद तसेच रहिवासी उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्युत संनियंत्रण समिती पुणे जिल्ह्याचे सदस्य संतोष सौंदणकर यांनी केले. ही सिस्टीम बारा किलो वॅट असून संस्थेच्या टेरेस वर बसवली आहे तसेच या सिस्टीमचे काम सारा सोलर सिस्टिम यांनी केलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.