Chinchwad : ऑटो क्लस्टरसमोर जाळला जातोय कचरा

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील ऑटो क्लस्टरसमोरील मोकळ्या जागेत गेल्या काही दिवसांपासून कचरा जाळला जात आहे. मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात असून त्याचा धूर एम्पायर स्क्वेअर मधील घरांमध्ये जात आहे. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

चिंचवड ऑटो क्लस्टरसमोर मोकळी जागा आहे. या जागेमध्ये कचरा टाकला जात आहे. तसेच गेल्या काही दिवासांपासून नागरिकांकडून कचरा जाळला जात आहे. मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जातो. त्यामुळे धुराचे लोट बाहेर येतात. धुराचे प्रमाण जास्त असल्याने एम्पायर स्क्वेअरमधील घरांमध्ये धूर जातो. हा धूर घातक असून त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे कचरा जाळणा-यांविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे.

महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, ”ऑटो क्लस्टरसमोरील मोकळ्या जागेत बुधवारी कचरा जाळला होता. महापालिकेने जाळ विझविला. परंतु, कचरा कोणी जाळला हे कळू शकले नाही. कचरा जाळणा-याचा शोध घेतला जाईल. कचरा जाळणे अथवा विहित कार्यपद्धतीव्यतिरिक्त कच-याची विल्हेवाट लावणे. हा दंडनीय अपराध आहे. कचरा जाळणा-यांविरोधात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण यांच्या आदेशानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.