BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad: घनकचरा कार्यशाळेला गृहनिर्माण सोसायट्यांचा मोठा प्रतिसाद 

73
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – ओल्या कच-यावर प्रक्रिया कशी करावी याबाबतची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या एक दिवसीय घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेला गृहनिर्माण सोसायट्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी घनकच-यावर प्रक्रिया करणा-या वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा, पध्दती, त्याबाबतची माहिती तसेच मार्गदर्शन केले. कार्यशाळेस आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी आशादेवी दुरगुडे, संदीप खोत, अण्णा बोदडे, श्रीनिवास दांगट, आशा राऊत, पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष विकास पाटील, किरण पंडीत तसेच सहा आरोग्याधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

यावेळी रोजलॅंड, सुमनशिल्प, श्रध्दा गार्डन, गोविंद दर्शन, सोनिगरा विहार, सोनिगरा आंगण, रिध्दी सिध्दी टॉवर, गुलमोहर गार्डन, रिव्हर रेसिडेंसी, गंगा आशियाना, निसर्ग सिटी, शिवम सोसायटी, एम. आर. प्राईड, गंगा स्काईज, ग्रीन्स सोसायटी, शांतीबन, सुखवानी कॅस्टल आदी गृहनिर्माण सोसायटीच्या प्रतिनिधींनी कार्यशाळेत सहभाग घेतला. कार्यशाळेबरोबरच याठिकाणी घनकचरा व्यवस्थापनावर प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यामध्ये कचऱ्यापासून खत निर्मिती, गॅस निर्मितीबाबतचे प्रात्यक्षिक दाखविले जात आहे. 8 डिसेंबर अखेर हे प्रदर्शन ऑटो क्‍लस्टरमध्ये सुरू राहणार आहे.घनकचरा व्यवस्थापन नियम-2016 अंतर्गत प्रत्येक नागरिकाने ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा तसेच दिवसाला शंभर किलो अथवा त्याहून अधिक कचरा निर्माण करणा-या सोसायट्यांनी कच-यावर प्रक्रिया करणे बंधनकारक असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त गावडे यांनी दिली. सहायक आरोग्याधिकारी प्रभाकर तावरे यांनी घरगुती कच-यापासून खत निर्मितीची पाईप पध्दत, कुंडया-मडके पध्दत, बगीच्या मधील पालापाचोळा न जाळता साठवून खतनिर्मिती करण्याच्या पध्दती सांगितल्या. यावेळी संजीवनी बॅग्जचे प्रात्यक्षिक देण्यात आले. तसेच वायु मित्र संस्थेचे सागर माने यांनी खत निर्मितीपासून तयार होणा-या घरगुती गॅसचे प्रात्यक्षिक दाखविले. अण्णा बोदडे यांनी आभार मानले.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3