Chinchwad : नालेसफाई, जलपर्णी काढण्याच्या कामाला गती द्या; श्रीरंग बारणे यांच्या अधिका-यांना सूचना

एमपीसी न्यूज – पावसाळा तोंडावर आला असतानाही महापालिकेचे (Chinchwad) नालेसफाईचे काम पूर्ण झाले नाही. अतिशय संथगतीने काम सुरु आहे. नदीपात्रातील जलपर्णी देखील जैसे थे आहे. महापालिका प्रशासनाने वेगाने नालेसफाई आणि जलपर्णी काढण्याचे काम पूर्ण करण्याची सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली.

याबाबत आयुक्त कार्यालयाला पत्र पाठविले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, पावसाळ्यात सखलभाग जलमय होऊ नयेत, नदी-नाले दुथडीभरून पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने हाती घेतलेले नालेसफाईचे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. पिंपरी-चिंचवड शहर परिसरात छोटे – मोठे मिळून १४८ नाले आहेत. सर्व नाले अद्यापही पूर्णपणे साफ झाले नाहीत.

Chinchwad : रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी द्या

वेळीच नालेसफाई पूर्ण झाली नाही. तर, पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरेल. नागरिकांना त्रास होईल.  पावसाळा सुरु होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे शहरातील उर्वरित नाले जलदगतीने  साफ करुन (Chinchwad) घ्यावेत. जेणेकरुन पाऊस झाल्यानंतर पाणी तुंबणार नाही. घरांमध्ये पाणी शिरणार नाही. नालेसफाई झाल्यास नदी पात्रात घाण जाणार नाही. पवना नदीपात्रात चिंचवडच्या पुलाजवळ मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पावसाळ्यापूर्वी तो गाळ काढून घ्यावा.

शहरातून वाहणा-या पवना, इंद्रायणी, मुळा नदीपात्रात अनेक ठिकाणी अद्यापही जलपर्णी दिसत आहे. जलपर्णी काढण्याच्या कामाची मुदत संपण्यासाठी काही दिवस शिल्लक असतानाही जलपर्णी काढून झाली नाही. ठेकेदारांकडून पाऊस पडण्याची वाट पाहिली जाते. याकडे लक्ष देवून तातडीने नदीपात्रातील जलपर्णी काढून घ्यावी. जेणेकरुन पावसाळ्यात ही जलपर्णी वाहून जावून पुढील भागातील नागरिकांना त्रास होणार नाही, अशी सूचनाही खासदार बारणे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.