Chinchwad : ‘स्टार इंजिनिअर्स’ कंपनीचा ‘या’ घटनेत संबंध नाही

एमपीसी न्यूज : चाकण येथे सोबत काम करणाऱ्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी पीडित महिलेने 29 जून रोजी म्हाळुंगे चौकीमध्ये फिर्याद दिली होती.

Pune Crime News : पाचव्या मजल्यावरून खाली कोसळल्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू

या महिलेने दिलेल्या तक्रारीत आरोपी आणि तिची ओळख ‘स्टार इंजिनिअर्स’ या कंपनीमध्ये सोबत काम करताना झाल्याचे म्हंटले होते. परंतु, फिर्यादी आणि आरोपी दोघांनीही हि कंपनी खूप आधीच सोडल्याचे कंपनीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हंटले आहे. फिर्यादी महिलेने 2020 मध्ये तर आरोपीने 2019 मध्ये कंपनी सोडली असून, सदर घटना 20 फेब्रुवारी 2022 ते 8 जून 2022 च्या दरम्यान घडली आहे. त्यामुळे फिर्यादीने कंपनीचे नाव जोडल्याने कंपनी नाहक बदनामीला सामोरे जात असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनी कोणत्याही कर्मचाऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्यात हस्तक्षेप करत नाही. असेही कंपनीने प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.