Chinchwad : सोलापूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्केटबोर्ड स्पर्धेची राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा संपन्न

एमपीसी न्यूज : ‘सिंहगड इन्स्टिटयूट, सोलापूर’ येथे दिनांक 27 मे ते 29 मे 2022 रोजी राष्ट्रीय स्केटबोर्ड स्पर्धा होणार आहे. नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड (Chinchwad) या ठिकाणी या राष्ट्रीय स्केटबोर्ड स्पर्धेसाठी राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. ही निवड चाचणी स्पर्धा स्केटबोर्ड असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने घेण्यात आली.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणाहून खेळाडू आले होते. या स्पर्धेतून महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला. स्टुडन्ट ऑलिम्पिक असोसिएशन पुणेचे अध्यक्ष तसेच नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचे अध्यक्ष अमित गोरखे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला. त्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छाही दिल्या.

Akurdi News : सांस्कृतिक भवनाचे काम सुरु करण्याची मागणी

या स्पर्धेसाठी उस्मानाबादचे सुनील शिंदे, पिंपरी चिंचवडचे विजय टेपुगडे, नाशिकचे नागेश शेट्टीकर, यवतमाळचे प्रवीण सर, लातूरहून सचिन सर, सांगलीमधून विनायक सर, सोलापूरचे निखिल सर तर विशाल सर हे मुंबईहून असे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : (Chinchwad)

प्रथम : यवतमाळ
द्वितीय : पिंपरी चिंचवड
तृतीय : सोलापूर

या स्पर्धेत विजयी खेळाडूंमध्ये नॉव्हेल स्कूलच्या आस्मि गायकवाड व पुनीत पाटील या खेळाडूंचा समावेश होता. या दोन्ही खेळाडूंची सोलापूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्केटबोर्ड स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.