Chinchwad : होर्डिंगचे  स्ट्रक्चरल ऑडीट करा, आमदार जगताप, माजी विरोधी पक्षनेते काटे यांची मागणी

एमपीसी न्यूज – पावसाळ्यात  वादळ , पाऊस, वाऱ्याने होर्डिंग कोसळून होणाऱ्या ( Chinchwad ) दुर्घटना टाळण्याकरिता  शहरातील उभारण्यात आलेल्या होर्डिंग्जचे (जाहिरात फलक) स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची मागणी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

Pune-Bhuvaneshwar Express : पुणे-भुवनेश्वर दरम्यान सुपर फास्ट विशेष गाडी

याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरातील सर्व अनधिकृत व स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट (स्थिरता प्रमाणपत्र) न देणाऱ्या सर्व  होर्डिंगवर  जाहिरात फलकांवर तत्काळ  कारवाई करावी व जाहिरात धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित मनपा अधिकाऱ्यांना  तत्काळ देण्यात यावेत.

उद्योगनगरीतील स्थापत्य विषयक लेखापरीक्षण न केलेले सर्व होर्डिंग्ज (जाहिरात फलक) काढून टाकावे तसेच अनधिकृत जाहिरात फलकांवर कठोर कारवाई करताना प्रमुख्याने धोकादायक, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या जाहिरात फलकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आमदार जगताप  यांनी लेखी पत्राद्वारे केली.

नुकत्याच मुंबई येथील घाटकोपर परिसरात होर्डिंग दुर्घटना झाली. त्यात निष्पाप  नागरिकांचा बळी गेला आहे, हि खूप दुख:द व गंभीर बाब असून प्रशासनाच्या दुर्लक्ष व हलगर्जी पणामुळे हि घटना घडली आहे. याच धर्तीवर आपल्या पिंपरी-चिंचवड शहरात अनेक परवाना  धारक व अनधिकृत होर्डिंग आहेत. पावसाळा देखील काही दिवसांवर आला असून , या पावसाळ्याच्या दिवसात वादळ व मुसळधार पावसाची शक्यता आहे. अशातच काही होर्डिंगमुळे दुर्घटना घडू नये त्यासाठी खबरदारी म्हणून  संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील होर्डिंगचे सुरक्षेचा द्रुष्टीने स्ट्रक्चर ऑडीट करण्यात यावे, व दोषीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काटे यांनी ( Chinchwad ) केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.