Chinchwad: दहावी व बारावीतील गुणवंताचा ‘युनिक स्टुडंट’ पुरस्काराने रविवारी गौरव

एमपीसी न्यूज – पवना ग्रुप संचलित ‘युनिक व्हिजन लाईफ लाँग लर्निंग’ या उपक्रमांतर्गत इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या गुरुतुल्य माता-पित्यांसह येत्या रविवारी (दि.12)’युनिक स्टुडंट’ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती शिवसेनेच्या नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

चिंचवड, पवनानगर येथील काशिधाम मंगल कार्यालयात रविवारी दुपारी चार वाजता हा गौरव सोहळा होणार आहे. यावेळी अभिनेते राहुल सोलापूरकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे, उपसभापती शर्मिला बाबर, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे आदी उपस्थितीत राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.