Chinchwad : पुस्तकाच्या देवाणघेवाणीला पालकांचा चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या चिंचवडमधील पालकांकडून गेल्या तीन वर्षांपासून पुस्तकांची देवाणघेवाण हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमास पालक व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके पुढील वर्षी त्या इयत्तेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. या पाठयपुस्तकांचे  विनामूल्य वाटप होते. यामागील उद्देश सांगताना पालक मनीष सोनिगिरा म्हणाले की, आपल्याला हवे ते शिक्षण घेण्यात किंवा सज्ञान करण्यात पुस्तकांचा मोठा वाटा आहे. निकाल लागल्यानंतर सुट्य्यांमध्ये प्रत्येक घरातील पाच ते दहा किलो पुस्तकांची रद्दी विकली जाते. आपल्याला पुस्तकाची गोडी लागावी म्हणून पुस्तके रद्दीमध्ये न देता हीच पुस्तके पुढील वर्षीच्या इयत्तेत जाणा-या विद्यार्थ्याला उपयोगी पडतील. नवीन पुस्तके घेण्याइतपत परिस्थिती त्यांच्या पालकांची नसते. हे विद्यार्थी या पुस्तकांचा वापर योग्य रितीने करु शकतील. मुलांना आपली पुस्तके नीट वापरण्याची सवय लागून पर्यावरणाचे रक्षण होते.

यावर्षी चिंचवड येथील मोरया ग्राऊंडच्या बाहेर हा उपक्रम राबविण्यात आला. सुमारे 350 पालकांनी त्याचा फायदा घेतला. व पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य केले. यामध्ये प्रमुख पुढाकार मनीष सोनिगिरा, पी. सुरेश, प्रसाद गोडा. दिग्विजय गजेश्वर,  हर्षाली कांकरिया आदींनी भाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.