Chinchwad : विद्यार्थ्यांनी आवडीचा अभ्यासक्रम निवडावा – डॉ. राजेंद्र कांकरीया

एमपीसी न्यूज – बारावी परिक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक कोणता अभ्यासक्रम निवडावा, याबाबत संभ्रमावस्थेत असतात. असंख्य अभ्यासक्रमाबाबत माहिती उपलब्ध करतात. मात्र, नेमकी कोणत्याही अभ्यासक्रमाची निवड करावी, हे निश्चित करता येत नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या करीअरची निवड करताना गुणपत्रिकेवरील गुणांना महत्त्व देण्यापेक्षा प्रथम आपली स्वतःची गुणवत्ता तपासावी. अभ्यासक्रम निवडताना आपल्या आवडीचा विषयांचा विचार करावा, असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र कांकरीया यांनी केले.

चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालयात बारावीत उत्तीर्ण आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत खुल्या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन कमला शिक्षण संकुलाचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

  • यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या प्रा. जयश्री मुळे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. वनिता कुर्‍हाडे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. जस्मीन फरास उपस्थित होते. दरम्यान, बारावीच्या परीक्षेत 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ते पुढे म्हणाले, प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याचा मार्गदर्शन जरूर करावे. परंतू पाल्याच्या मनाविरुद्ध अभ्यासक्रम लादू नये. आर्थिक परिस्थितीची जाणीव स्पष्टपणे देवून आवडीचे करीअर निवडण्यासाठी सकारात्मक प्रोत्साहन द्यावे.

  • आजच्या खुल्या मेळाव्याचे उद्घाटक व आयोजक, कमला शिक्षण संकुलाचे सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, मला अत्यंत कमी गुण परिक्षेत मिळालेले असताना देखील जिद्द, चिकाटी निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत, भारतात सर्व प्रथम दुधाचा प्लॅस्टिकचा टिकाऊ कॅन बनवून एक स्वःताची वेगळी ओळख निर्माण करीत यश प्राप्त केले.

याबाबत सखोल माहिती विद्यार्थी आणि पालकांना त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले, संस्थेत शिकणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास केंद्रबिंदू ठेवून येथे शिक्षणाबरोबरच चर्चा सत्र, वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योजक, तज्ञाकर्वी विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. जेणेकरून तो भावी स्पर्धेत तो विद्यार्थी यशस्वी होईल. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. वनिता कुर्‍हाडे यांनी केली. आभार प्रा. संध्या गोरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.