Chinchwad : शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी

एमपीसी न्यूज- शिवसेना जिल्हासंघटिका सुलभा उबाळे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी शिवसेना महिला आघाडी व युवासेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघात पक्षाची पुढील दिशा ठरवण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी पक्षाचे मतदारसंघातील ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी सुलभ उबाळे यांचे कार्यकर्ते बैठकीत त्यांचे मत मांडत होते. यावेळी बाजीराव लांडे यांनी एका माजी खासदारांबाबत अर्वाच्य शब्दप्रयोग केला. सुलभ उबाळे यांनी लांडे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी उबाळे यांना धक्काबुक्की केली.

या प्रकाराबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. सुलभ उबाळे या शहरातील मातब्बर शिवसेना नेत्या आहेत. दोनवेळा त्यांनी भोसरी विधानसभेची निवडणूक लढविली असून 1 वर्षे नगरसेविका, शिवसेना गटनेत्या तसेच पिं.चि.मनपा. च्या विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी काम केले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील राजकारण त्यांच्या अवतीभवती फिरत आहे. येणाऱ्या काळात त्यांच्यावर असा प्रसंग उदभवू शकतो. त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.

यावेळी नगरसेविका मीनल यादव, शशिकला उभे, आशा भालेकर, वैशाली मराठे, भारती चकवे, नयना पारखे, स्वाती मोरे, युवासेनेचे सचिन सानप, प्रतीक्षा घुले, कुणाल जणगाडे, निलेश हाके, सागर शिंदे, अमित शिंदे, दीपा गुरव, प्रतीक्षा लोयरे, प्रिया जगदाळे, सुधीर कुंभार, किशोर शिंदे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.